अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ मार्च):-दि.०६ मार्च रोजी रात्री कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की,अहमदनगर शहरातील झेंडीगेट परिसरातुन काही गोवंशीय जनावरांच्या कत्तल केलेले मांसाची पिकअप वाहन हे झेंडीगेट येथुन औरंगाबादकडे जाणार आहे. अशी माहिती मिळाल्याने मा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व गुन्हे शोध पथक यांनी अशोका हॉटेल ते कोठला स्टॅण्डरोड परिसरात सापळा लावला असता झेंडीगेट येथुन एक पांढ-या रंगाचा पिकअप हा अशोका हॉटेल हायवेकडे संशयितरित्या येतांना दिसला त्यास पोलीसांनी थांबण्याचा इशारा केला असता तो तेथुन औरंगाबाद दिशेन त्याचे ताब्यातील पिकअप घेवुन पळुन जात असतांना सदर पिकअप वाहनाचा पाठलाग करुन त्यास रेस्ट हाऊस समोर औरंगाबाररोड येथे थांबवुन त्या गाडीची पाहणी केली असता सदर पिकअप गाडी मध्ये गोवंशीय जनावरांचे मांस दिसुन आले. त्यावेळी सदर पिकअप वरील चालकास त्याचे साथीदारास त्यांचे नावे विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १)असद गफुर शेख वय-३२ वर्षे रा. वाळकी ता.जि अहमदनगर २)आयान जाकीर कुरेशी वय-१९ वर्षे रा.झेंडीगेट अहमदनगर असे असल्याचे सांगीतले तसेच त्याचे पिकअपमधील मिळुन आलेले गोमांस हे गौस उर्फ शाहरुख मोहंमद कुरेशी रा झेंडीगेट अहमदगनर (फरार) यांचे मालकीचा असुन सदरचे गोमांस हे औरंगाबाद येथे घेवुन जात असल्याचे सांगीतले त्यांचेकडे १,८०,०००/-रु किंमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मांसाचे तुकडे सुमारे ९०० किलो वजनाचे गोमांस,व ३,५०,०००/-रु किंचा एक पांढ-या रंगाचा पिकअप असा एकुन ५,३०,०००/-रु.किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन त्याचे विरुध्द कोतवाली पोस्टे गुरनं २/२०२३ भादंवि कलम २६९,महाराष्ट्र प्राणी संरक्षण(सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५ (क), ९(अ),मोवाकाक १३२/१७७ प्रमाणे पोकाँ/ १७३८ सागर मधुकर मिसाळ यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोसई/मनोज कचरे हे करीत आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक/चंद्रशेखर यादव, पोसई/मनोज कचरे,पोहेकॉ/गणेश धोत्रे,पोना/योगेश भिंगारदिवे,पोना/रियाज इनामदार,पोना/योगेश खामकर,पोकॉ/संदिप थोरात,पोकॉ/कैलास शिरसाठ,पोकॉ/सोमनाथ राऊत,पोकॉ/अमोल गाढे, पोकॉ/सुजय हिवाळे,पोकॉ/सागर मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.
