प्रतिनिधी(दि.९ मार्च):-दि ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त Being Volunteer Foundation यांच्या वतीने येरवडा येथील मदर टेरेसा हॉलमध्ये महिला सक्षमीकरण संदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यात कैलास नरवडे सर यांनी महिलांना महीला सक्षमीकरणा संदर्भात मार्गदर्शन केले महिलांनी स्वतःपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामोरे कसे जायचे याचे सरांनी धडे दिले.
तसेच कार्यक्रमात सहभागी झालेल्या ८५ महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे ज्योती गायकवाड यांनी प्रास्ताविक सादर केले.तसेच सामजिक कार्यकर्त्या सौ.नीता गागडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर सामाजिक कार्यकर्त्या रेहाना सारवान यांनी महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.

