अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ मार्च):-अहमदनगर शहरात १० मार्च रोजी शिवजयंती साजरी होणारं आहे.मोठ्या उत्साहात साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीला गालबोट लागु नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी कोतवाली पोलिस ऍक्शन मोडवर आले आहे.शहरात मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार कोतवाली हद्दीतील तब्बल १०८ जणांना पोलिसांनी प्रतिबंधात्मकतेच्या नोटिसा बजावल्या आहे.त्यामध्ये crpc १४९ प्रमाणे ४५ जणांना , crpc १४४ प्रमाणे ४१ जणांना तर crpc १०७ प्रमाणे २२ जणांना असे एकूण १०८ जणांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहे.अहमदनगर शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हें गुन्हेगार व टवाळखोरांसाठी कर्जत पँटर्न वापरत असल्याचे बोलले जात आहे.१० मार्च रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन निघणाऱ्या शिवजयंती मिरवणूक मार्गावर चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली ३५ ते ४० CCTV कँमेंरे देखील बसविण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मिरवणूक मार्गावरील संवेदनशील भागात लाईट गेल्यास पोलिसांच्या वतीने लाईटची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.
