अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ मार्च):-अहमदनगर शहरात १० मार्च रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी होणाऱ्या शिवजयंती उत्सव मिरवणुकीला गालबोट लागु नये किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिस ॲक्शन मोडवर आले आहे.शहरात मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तोफखाना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी/दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार हद्दपारची कारवाई केली आहे.तोफखाना हद्दीतील तब्बल ९९ जणांना १४४ प्रमाणे कारवाई केली आहे.तसेच भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सपोनी/ दिनकर मुंडे यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी १४४ प्रमाणे ९० जणांवर हद्दपारची कारवाई केली आहे.
