अहमदनगर प्रतिनिधी(दि.९ मार्च):-अहमदनगर शहराच्या काही अंतरावर असणाऱ्या भिंगार जवळील बाराबाभळी येथील महेश नगर येथे नागरी वस्तीत राहत्या घराच्या कंपाउंड मध्ये पाणी व खाद्याच्या शोधामध्ये लांडगा आढळून आला असता तेथील नागरिकांनी लांडगा बघून सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मोठ्या कौशल्याने सदर लांडगा धरला व लांडगा पाहून तेथील उपस्थित नागरिकांच्या मनात धडकी भरली तर शेवटी लांडगा पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेच्या श्वास सोडला.सकाळी सर्पमित्र कृष्णा बेरड पाटील यांनी वनअधिकारी वनपाल सचिन शहाणे, वनरक्षक अर्जुन खेडकर,वनकर्मचारी पी.एन बनसोडे, ए.के.साठे,अमोल गायकवाड यांनी लांडग्याची निसर्गात मुक्तता केली.यावर्षी लांडग्यांची वाढ झाली असून प्राणी हे पाणी व खाद्याच्या शोधामध्ये कोठेही आढळून येणार असून दिसल्यास त्यांना मारू नये व त्यासाठी 9370075555 या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन कृष्णा बेरड पाटील यांनी केले आहे.
