प्रतिनिधी (दि.१० मार्च):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील युनियन बँकेच्या समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख 13 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना बुधवारी दि.8 मार्च रोजी दुपारी दीड वाजता घडली आहे.याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,संगमनेरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या एका कंपनीतील कर्मचारी शरद रमेश गुजराती हे सव्वा पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन समनापुर येथील एका स्टील व्यापाऱ्यास देण्यासाठी गेले होते.तेथे त्यांनी तीन लाख रुपये दिले. तसेच शिल्लक रक्कम आपल्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवून ते समनापुर घुलेवाडी रस्त्याने घुलेवाडीतील युनियन बँकेमध्ये आले होते.बँकेच्या आवारामध्ये दुचाकी उभी करून ते बँकेत गेले असता आपल्या कामास वेळ लागण्याची शक्यता दिसल्याने ते पुन्हा बाहेर आले.आपल्या दुचाकीच्या डिक्की मध्ये रोख रक्कम असल्याने त्यांनी दुचाकीची डिक्की उघडून बघितले असता डिक्कीतून रक्कम गायब झाल्याचे समोर आले.त्यांनी आसपास चौकशी केली असता दोघेजण दुचाकीवरून सुसाट वेगाने तेथून गेल्याची माहिती त्यांना मिळाली.त्यामुळे या दोघा अज्ञातांनी दुचाकीच्या डिक्कीतील रोकड लांबविल्याची शक्यता बळावल्याने त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात दोघा अज्ञातांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.
Trending Topics:
Trending
- मध्यप्रदेशातून विक्रीसाठी आणले ५ गावठी कट्टे,सोनईत विक्रीची तयारी मात्र ‘एलसीबी’च्या धडक कारवाईने खेळ खल्लास..!
- एमआयडीसी पोलिसांचा धमाका:हॉटेल ‘गुडलक’ मधील निर्घृण हत्याकांडाचा पर्दाफाश.. तिसऱ्या आरोपीच्याही मुसक्या आवळल्या गुन्ह्याची दिली कबुली..
- नागपंचमीत महिलांचे दागिने लांबवणारी टोळी गजाआड..LCB च्या धाडीत लाखोंचे सोने जप्त..!
- ‘हॉटेल गुडलक’ ठरले बॅडलक..! मॅनेजर पदाच्या पूर्वतयारीवेळी तरुणाची हत्या..पळून जाण्याच्या बेतात असताना दोघांना एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!
- अहिल्यानगराच्या बदलत्या चेहऱ्याचे दर्शन;तोफखान्यात सिद्धेश्वर बाल मंडळाचा ‘विकासाचे महामेरु सुजयदादा’ देखावा ठरतोय लक्षवेधी..!
- स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून फसवणूक करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद:एलसीबीची मोठी कारवाई,नागपूरचे ३ भामटे गजाआड!
- मध्यस्थी जीवावर बेतली..! कत्तीने सपासप वार करून तरुणास संपवलं;पळणाऱ्या नराधमाच्या अखेर एलसीबीने कल्याण मधून आवळल्या मुसक्या..
- सुसंस्कृत व राष्ट्रभक्त तेजस्वी पिढीची निर्मिती मातेच्या हाती..!श्रमिकनगर येथे विश्वमांगल्य सभेची बैठक उत्साहात संपन्न;मातृशक्तीचा जागर करण्याचे संयोजिका रजनी भंडारी यांचे आवाहन..
