Maharashtra247

‘अ‍ॅपेक्स’च्या शिबिरात १२५ रुग्णांची माेफत तपासणी किडनी विकार तज्ज्ञ डाॅ.साईप्रसाद शिंदे यांनी रुग्णांना केलं मार्गदर्शन

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.१० मार्च):-जागतिक किडनी (मूत्रपिंड) दिनानिमित्ताने मेडप्लस् अहमदनगर अ‍ॅपेक्स हाॅस्पिटल मेल्टिस्पेशालिटीच्यावतीने आयाेजित करण्यात आलेल्या माेफत आराेग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे १२५ रुग्णांची माेफत तपासणी करण्यात आल्याची माहिती अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे संचालक किडनी विकार तज्ज्ञ डाॅ. साईप्रसाद शिंदे यांनी दिली.या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी सवलतीच्या दरात करण्यात आल्या.तसेच काही रुग्णांना तपासणीत किडनीचं साैम्य आजार आढळून आले. त्यावर मार्गदर्शन करून औषधोपचार देण्यात आल्याचेही डाॅ. शिंदे यांनी सांगितले.डाॅ.साईप्रसाद शिंदे म्हणाले,”किडनी हा शरीरातील अवयव म्हणजे फिल्टर आहे.शरीर शुद्ध ठेवण्याचे कार्य किडनी करत असते.या अवयवाची काळजी घेतल्यास काेणताही आजार हाेणार नाही.या अवयवाकडे दुर्लक्ष केल्यास वेगवेगळे आजार उद्धभवू शकतात. अहमदनगर शहरातील अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलमार्फत राबविण्यात आलेल्या शिबिरात रुग्णांना हेच मार्गदर्शन करण्यात आले”.या शिबिरात सुमारे १२५ रुग्ण सहभागी झाले हाेते.या रुग्णांची माेफत वैद्यकीय तपासणीबराेबर औषधाेपचाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.अहमदनगर शहरासह पाथर्डी, शेवगाव, नेवासे, श्रीगाेंदे,राहुरी,श्रीरामपूर,पारनेर या तालुक्यांसह बीड जिल्ह्यातूनही रुग्ण या शिबिरात सहभागी झाले हाेते, अशी माहिती डाॅ. साईप्रसाद शिंदे यांनी दिली.हे शिबिर सुरू असताना राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत हाेते. त्यांनी आराेग्यविषयक बजेटमध्ये माेठ्या तरतुदी केल्या आहेत. यात महात्मा ज्याेतिराव फुले जनाराेग्य याेजनेची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. या याेजनेद्वारे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी चार लाखांपर्यंत मदत मिळणार असल्याची घाेषणा करण्यात आल्याचीही माहिती डाॅ. साईप्रसाद शिंदे यांनी दिली.या शिबिराला सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली.अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. संताेष गांगर्डे यांनी प्रास्ताविक केले.डाॅ.धनंजय वारे,डाॅ.ईश्वर कणसे, डाॅ.महेश जरे,डाॅ.प्रशांत काळे,डाॅ.दिलीप बागल, डाॅ. कृणाल काेल्हे,डाॅ.सचिन साेलाट,डाॅ.नय्यर हरीश शिबिराला उपस्थित हाेते.अ‍ॅपेक्स हाॅस्पिटलचे हेमंत त्र्यंबके,कल्पना शिंदे,बाळू वाघ,रेणुका राव, निखील सातपुते,जया म्हस्के,महेश कराळे,विकास गांगर्डे,महेश रासकर यांनी शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.जनसंपर्क अधिकारी रामदास शेवाळे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page