अहमदनगर प्रतिनिधी (दि.१४ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात कोपर्डी येथे १५ फुटी बोअरवेल मध्ये पडलेल्या ५ वर्षीय सागरला बाहेर काढण्यात NDRF च्या टीमला अखेर यश मिळाल परंतु त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.९ तासांच्या बचावकार्यानंतर त्याला बाहेर काढण्यात आले.मध्यप्रदेश येथील बुऱ्हाणपुर येथून ऊस तोडीच काम करण्यासाठी बरेला कुटुंबीय कर्जत तालुक्यात आल.त्यांना ऊस तोडीच काम मिळाल व ते शेतात एका झोपडीत राहु लागले मात्र त्याचं शेतात असलेल्या एका बोअरवेल मध्ये बलरे कुटुंबातील ५ वर्षीय सागर बरेला हा खेळताना पडला.संध्याकाळी ७ च्या सुमारास सागर बोअरवेल मध्ये पडल्यानंतर त्याची शोधाशोध झाली मात्र रडण्याच्या आवाजाने अखेर तो बोअरवेल मध्ये पडल्याचे दिसले.दरम्यान कर्जत येथील प्रशासनाने NDRF टीम दाखल होई पर्यंत ऑक्सिजनच्या नळ्या बोअरवेल मध्ये सोडल्या होत्या.NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाल्यानंतर १५ फूट खोल बोअरवेल मध्ये पडलेला सागर लवकर बाहेर निघेल अशी आशा होती मात्र सागरला बाहेर काढण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात १० फुटानंतर अचानक खडक लागला आणी सागरला काढण्यासाठी तब्बल ९ तासांचा कालावधी गेला.दरम्यान NDRF च्या अथक बचावकार्यामुळे ५ वर्षीय सागरला १५ फुटी बोअरवेल मधुन बाहेर काढण्यात आले असून त्याला उपचारार्थ तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.परंतु त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
