अहमदनगर प्रतिनिधी(दि.१४ मार्च):-आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञान क्षेत्र गावडे मळा पाईपलाईन रोड येथे ५ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१५ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता गुरुपूजा सत्संग व महाप्रसादाचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले आहे.या कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे संध्याकाळी ६.०० वाजता सर्व गुरुपूजा पंडित मिळून यांची गुरुपूजा, ६.३० ते ७.३० प्रकाश बडजाते आणि टीम यांचा सत्संग कार्यक्रम,७.३० ते ८.३० स्वामी ब्रह्मचैतन्य यांच्या उपस्थितीत ज्ञान सत्र,रात्री ८.३० नंतर महाप्रसादाचे वाटप होईल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.तरी परिसरातील व शहरातील महिला,नागरिकांनी,मुले,मुली यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
