अहमदनगर प्रतिनिधी(दि.२५ मार्च):-नगर पुणे रोडवरील बसस्थानकात शुक्रवारी (दि.२४) सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर पुणे बसस्थानकात बेशुद्धावस्थेत एक इसम आढळून आला.त्यास रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यास घोषित केले. मृत संबंधित व्यक्तीविषयी माहिती असल्यास नातेवाइकांनी कोतवाली पोलिस स्टेशन येथे संपर्क करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.मृत्यूमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही.अधिक तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.