Maharashtra247

ब्रेकिंग स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ४ गावठी कट्टे व ८ जिवंत काडतूस कब्जात बाळगणारे दोघे जेरबंद

अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ मार्च):-श्रीरामपूर तालुक्यातील बेलापुर बु.येथील बाजारतळ येथे विक्री करण्याचे उद्देशाने चार (०४) गावठी कट्टे व आठ (०८) जिवंत काडतुसे अवैधरित्या कब्जात बाळगणारे दोन आरोपी १,४५,७००/- रु.किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब,यांनी पोलीस निरीक्षक अनिल कटके,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांना जिल्ह्यात अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे या विरुध्द जास्तीत जास्त कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे जिल्ह्यातील अवैध अग्नीशस्त्रे व हत्यारे याबाबत माहिती घेत असतांना गुप्तबातमीदारा कडून माहिती मिळाली की, रेकॉर्ड वरील इसम नामे दत्तात्रय डहाळे रा.शिर्डी हा त्याचे साथीदारासह गावठी कट्टे व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी बाजारतळ, बेलापुर बुद्रुक ता.श्रीरामपुर येथे येणार आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. नमुद आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई/सोपान गोरे,पोहेकॉ/ २१४५ मनोहर सिताराम गोसावी,पोहेकॉ/२१६४ दत्तात्रय विठ्ठल गव्हाणे, पोहेकॉ/८७२ सुरेश माळी, पोहेकॉ/संदिप घोडके पोना/ विशाल दळवी,पोना/शंकर चौधरी,पोना/दिलीप शिंदे, पोना/संदिप चव्हाण पोकॉ/ सागर ससाणे,पोकॉ/रोहित येमुल पोकॉ/रणजित जाधव व चापोहेकॉ उमांकात गावडे, चापोहेकॉ/अर्जुन बडे अशांनी मिळून वेशांतर करुन मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने बेलापुर बु ता. श्रीरामपुर येथील बाजारतळ येथे जावुन सापळा लावुन थांबलो असता नमुद बातमी प्रमाणे रेकॉर्डवरील इसम नामे दत्तात्रय डहाळे व त्याचे सोबत एक इसम बेलापुर बु॥ बाजार वेशीतून बाजारतळाकडे पायी येतांना दिसल्याने पथकाची खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (१)दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा.श्रीराम नगर, शिर्डी,ता.राहाता जि. अहमदनगर (२) सुलतान फत्तेमोहमद शेख वय २९ रा. महलगल्ली,बेलापुर बु.ता. श्रीरामपुर जि.अहमदनगर असे असल्याचे सांगीतले.त्यांचे अंगझडतीत एकुण १,४५,७००/- रु. किमतीचा मुददेमाल त्यात ०४ देशी बनावटीचे पिस्टल,८ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल वरील नमुद दोन्ही इसमांचे कब्जात मिळून आला आहे.दत्तात्रय सुरेश डहाळे वय ३४ रा. श्रीराम नगर,शिर्डी, ता. राहाता जि.अहमदनगर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापुर्वी औरंगाबाद जिल्हयात अग्नीशस्त्र सह एक तसेच खुनाचा प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अ.नं.१पोलीस स्टेशन पुंडलीक नगर पो.स्टे. जिल्हा औरंगाबाद गु.र.नंबर व कलम

१५९/२०१९ भा.द.वि. कलम ३०७ आर्म अॅ.क.३/२५

सदर गुन्हयात फरार आहे.

२शिऊर पो.स्टे. जि. औरंगाबाद

१०१/२०१६ भा.द.वि. कलम ३०२, १२० (ब) आर्म अॅ.क. ३/२५ सदर घटने बाबत पोहेकॉ/मनोहर सिताराम गोसावी नेम.स्थागुशा, अहमदनगर यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन आर्म अॅक्ट ३/२५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील कायदेशिर कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर,श्रीमती स्वाती भोर,अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग श्रीरामपुर व श्री.संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी,श्रीरामपुर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page