11 गोवंशीय वासरांची एमआयडीसी पोलिसांनी केली सुटका
अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ मार्च):-नगर मनमाड रोडवरील शिंगवे गावात ता.25 मार्च रोजी मालवाहतूक करणारी महिंद्रा कंपनीची पिकअप जीप क्र.MH.01,LA.4323 यामध्ये जनावरांचे दाव्याने पाय बांधून त्यांची क्रूरपणे वाहतूक करून कत्तलीसाठी नेत असताना एमआयडीसी सपोनि/राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी 3,30,500 रू.किमतीचा मुद्देमाल जप्त करून 11 गोवंशिय जनावरांची मुक्तता केली.पोकॉ/सुरज शुभाष देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1)शाहरुख सुलतान कुरेशी वय 25,रा.जामा मस्जिद जवळ,कुरेशी गल्ली,राहुरी बु.ता.राहुरी व एक विधी संघर्षित बालक यांच्याविरुद्ध गुरनं 240/2023 महा.पशुसंवर्धन अधी 1976 चे.कलम11(1) (ई)(ड) तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधी.1960 चे.क.5 व 9 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सापोनि/राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोना/राहुल शिंदे हे करीत आहेत.