Maharashtra247

अजामीनपात्र वॉरंट मधील पाच जणांना भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अटक 

 

अहमदनगर प्रतिनिधी(दि.२६ मार्च):-अजामीनपात्र वॉरंट मधील 5 आरोपींना भिंगार कॅम्प पोलीसांनी केली अटक,मा.न्यायालयाने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमधील आरोपींना अजामीनपात्र वॉरंट बजावनी कामी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनकडे वॉरंट प्राप्त झाले होते.या नंतर दि.25 मार्च रोजी रात्र गस्तीवरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमधील आरोपी नामे 1)अक्षय संजय भिंगारदिवे रा.निंबोडी ता.जि.अहमदनगर 2)रामा अंकुश इंगळे रा.निंबोडी ता.जि.अहमदनगर 3)पवन राजेंद्र नायकू रा.नेहरू चौक, भिंगार ता.जि.अहमदनगर 4) स्वप्निल सुधाकर शेलार रा.शिवाजी चौक, भिंगार ता.जि.अहमदनगर 5) महेश सुरेश गायकवाड रा.सरपन गल्ली,भिंगार ता.जि.अहमदनगर यांना सदर वॉरंटची बजावनी करून त्यांना सदर वॉरंटमध्ये अटक करून मा.न्यायालयासमोर हजर केले.वरील आरोपी यांना वारंवार समन्सची तसेच जामीनपात्र वॉरंटची बजावनी करून सुद्धा ते मा.न्यायालयासमोर हजर राहत नव्हते.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागिय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,यांचे मार्गदर्शना खाली भिंगार कॅम्प पोस्टे.चे सहाय्यक पोलीस निरीक्षक/ दिनकर मुंडे,पोहेकाँ/1859 जालींदर नामदेव आव्हाड, पोहेकाँ/2644 बिभीषन दिवटे,पोहेकाँ/643 रघूनाथ नानाभाऊ कुलांगे,पोना/2178 राहूल राजेंद्र द्वारके, पोकाँ/691 सागर भास्कर तावरे,पोकाँ/810 अमोल नवनाथ आव्हाड,पोकाँ/905 संदिप मधुकर शिंदे,चापोकाँ/941 अरूण भिमराव मोरे,चापोकाँ/631 भागचंद लगड,होम/इरफान पठाण अशांनी केली आहे.

You cannot copy content of this page