अहमदनगर प्रतिनिधी(दि.२८ मार्च):-गेल्या अनेक वर्षापासून परंपरा असलेल्या जिल्हा पोलीस को ऑप क्रेडिट सोसायटीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, या सोसायटीवर सत्ताधारी पॅनलचे वर्चस्व आहे.परंतु यावेळी परिवर्तन पॅनलने मोट बांधून पोलीस बांधवांना न्याय देण्याचे ठरवलं आहे त्यामध्ये परिवर्तन पॅनलने नेतृत्व संदिप घोडके,रेवन्नाथ दहिफळे,भिमराज खर्से,वैभव झिने यांच्या बरोबरच रिचर्ड गायकवाड,अभिजीत अरकलघाटकर दिपकजावेद शेख,संदिप जाधव,सविता खताळ,बाळासाहेब भोपळे, सचिन शिरसाट,राहुल द्वारके, प्रज्ञा प्रभुणे,मनिषा काळे यांनी परिवर्तन पॅनलची उमेदवारी करुन सत्ता परिवर्तनासाठी मोट बांधली आहे.पोलीस सभासदांन समोर परिवर्तन पॅनलने जाहिरनामा प्रसिद्ध केला तो पुढीलप्रमाणे
*प्रथम कर्ज एक लाख,द्वितीय पाच लाख,तिसरे कर्ज दहा लाख,त्याच बरोबर एक लाख रुपये तातडी कर्ज,जिल्हा भरात नवीन पोलीस वसाहत निर्माण करण्यासाठी गृहमंत्र्यांनकडे पाठपुरावा करणार,पोलीसांचे मानसिक खच्चीकरण होणार नाही यासाठी अग्रभागी राहणार अपघाती विमा,डिजिटल प्रणाली विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.तरी मतदार बांधवांनी छत्री चिन्हासमोर बटन दाबून परिवर्तन पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन परिवर्तन पॅनलच्या वतीने करण्यात आले आहे.
