अहमदनगर (प्रतिनिधी दि.२८ मार्च):-आपल्या सामाजिक कार्यातून नेहमी ठसा उमटवणारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या १ एप्रिल रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.यात प्रामुख्याने १ मार्च रोजी सकाळी ९ वाजता मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप प्रसिद्ध नेत्रतज्ञ गौतम चित्ते यांच्या माध्यमातून करणार आहे.दुपारी ११ वाजता हभप नितीन महाराज सावंत (परभणीकर) यांचे जाहीर कीर्तन,दुपारी २ वाजता स्नेह भोजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ६ वाजता भव्य मिरवणूक देवळाली प्रवरा सोसायटी चौक ते बाजार तळ,सायंकाळी ७ वाजता महिलांसाठी खास पैठणी साडी वाटप तसेच रात्री ८ वाजता सत्कार समारंभ होणार हे सर्व कार्यक्रम देवळाली प्रवरा बाजारतळ ता.राहुरी येथे १ एप्रिल रोजी होणार असून या कार्यक्रमास परिसरातील व तसेच संपूर्ण जिल्ह्यातून कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन सुरेंद्र भाऊ थोरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.