नागपूर प्रतिनिधी(रवींद्र खेडकर):-भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या श्रीमती. नीलिमाताई बोरेकर यांचा महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.हिंगणा तहसील कार्यालय मध्ये भूमी अभिलेख येथे कार्यरत असलेल्या नीलिमाताई बोरेकर यांचा महिला दिनाचे प्रमाणपत्र देऊन सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हा अध्यक्ष मंगला रवींद्र खेडकर, कुंदाताई राजू नानवटकर, नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर,नागपूर प्रतिनिधी राजू नानवटकर यांनी सत्कार केला.नीलिमाताई बोरेकर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सिटी इंडिया आणि सिटी फाउंडेशनचे काम नागपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे ते पुढे असेच कार्यरत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.नीलिमाताई बोरेकर यांचे काम कार्यालयीन वेळेत कायद्याच्या चाकोरीत बसून त्या आपल्या वेळेत करतात हे त्यांनी पहिल्यापासून अंगीकारलेले नियम आहेत. बोरेकर यांनी कठीण प्रसंगातून आपली नोकरी केली आहे.सर्वप्रथम नक्षलवादी भाग गडचिरोली, रामटेक आणि आता नागपूर जिल्ह्यात हिंगणा तहसील येथे भूमि अभिलेख येथे त्या सद्ध्या कार्यरत असून आपल्या नोकरीच्या माध्यमातून त्या समाजसेवा ही करत आहेत.
