अहमदनगर प्रतिनिधी(दि.२९ मार्च):-मोटार वाहन नियमांचे उल्लंघन करणारे कसुरदार वाहनचालक यांचे विरुध्द पोलीस विभागाकडुन ई डिव्हाईसद्वारे कारवाई करण्यात येत असुन अहमदनगर जिल्हयातील वाहनधारकांकडे सुमारे ५,४२,५०९ चलन अनपेड़ असुन त्यांचेकडे २२,९१,६३,१०० /- रु. अनपेड दंडाची रक्कमेचा भरणा प्रलंबित आहे.सदर वाहनचालक यांनी १५ दिवसांचे आत त्यांचेकडे प्रलंबित असलेल्या अनपेड दंडाचे रक्कमेचा भरणा करणे आवश्यक आहे,परंतु तरीदेखील सदर वाहनचालक यांनी त्यांना पाठविण्यात आलेल्या नोटीसकडे दुर्लक्ष करुन अदयापपावेतो त्यांचे कडे प्रलंबित असलेल्या दंडाच्या रक्कमेचा भरणा केलेला नाही.त्यामुळे शहर वाहतुक शाखा,अहमदनगर यांचे कडुन वर नमुद वाहनचालकांपैकी बऱ्याचश्या वाहनचालकांविरुध्द मा. न्यायालयात खटले पाठविण्यात येणार असुन त्यांना दि.३०/०४/२०२३ रोजी होणाऱ्या लोकअदालत मध्ये हजर राहुन वाहनावरील प्रलंबित दंडाच्या रक्कमेचा भरणा करावा लागणार आहे.त्या अनुषंगाने नमुद वाहनचालक यांना मा. न्यायालयातुन देखील नोटीस पाठविण्यात येणार आहेत.त्यामुळे अहमदनगर पोलीस दलाकडुन सर्व अनपेड दंडाची रक्कम बाकी असणारे वाहनचालक यांना अवाहन करण्यात येते की,त्यांनी दि. ३०/०४/२०२३ रोजी पुर्वी जवळील पोलीस ठाणे किंवा वाहतुक शाखेत जावुन आपल्या वाहनावरील अनपेड दंडाची रक्कम भरणा करावी. अन्यथा प्रलंबित अनपेड चलनाची रक्कम भरणा न केल्यास दि.३०/०४/२०२३ रोजी मा.न्यायालयात हजर राहुन न्यायालयीन कार्यवाहीला सामोरे जावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी.असे शहर वाहतूक शाखेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे.
