श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.२ एप्रिल):-गोमांस विक्री करण्याचे उद्देशाने कत्तलीसाठी जाणाऱ्या १६ बैलांची श्रीगोंदा पोलिसांनी सुटका करून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोघांवर प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.दि.१ एप्रिल २०२३ रोजी आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडी वय 38 वर्षे,व्यवसाय नोकरी (प्राणी कल्याण अधिकारी रा.तांदुळनेर ता.राहुरी जि.अहमदनगर.यांच्या फिर्यादीवरून 1)लहु गोरक्षनाथ कवचट वय 31 वर्षे रा.पोखरी ता.गेवराई जि.बीड 2)नंदकुमार तुकाराम लोंढे वय 48 वर्षे रा. कोळगाव ता.गेवराई जि.बीड दोघांवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 ( सुधारणा 2015) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पकडलेला आयशर टेम्पो व सुटका केलेल्या बैलांचे वर्णन खालीलप्रमाणे-
1)5,00,000/- रुपये किंचा आयशर टेम्पो क्रमांक MH-08-H-1947.
2)10,000/- रुपये किं.चा एक गावरान जातीचा काळ्या पांढऱ्या रंगाचा बैल.
3)1,50,000/- रुपये किं.चे दहा खिलार जातीचे पांढऱ्या रंगाचे बैल.
4)10,000/- रुपये किं. चा एक गावरान जातीचा तांबड्या रंगाचा बैल.
5)10,000/- रुपये किं. चा एक गीर जातीचा काळे पांढरे रंगाचा बैल.
6)20,000/- रुपये किं.चा दोन डांगी जातीचे पांढऱ्या रंगाचे बैल.
7)10,000/- रुपये किं. चा एक गावरान जातीचा काळ्या रंगाचा बैल. 7,10,000/- रुपये
