अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ एप्रिल):-नगर शहरातील बागरोजा हडको दिल्लीगेट येथील एका वीस वर्षीय तरुणाने आपल्या मोबाईलवर व्हाट्सअप स्टेटसवर वादग्रस्त स्टेटस ठेवला,त्या तरुणावर तोफखाना स्टेशनमध्ये भादवि कलम 505 (2) प्रमाणे पोलीस अंमलदार तनवीर सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तरुणाचे नाव फैजल अरिफ सय्यद असून या तरूणाने मोबाईलच्या स्टेटस मध्ये मिटा दुंगा भगवे का नाम या स्लोगनमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसला ठेवून धार्मिक व जातीय शत्रूत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.सोशल मीडियावर कोणतीही वादग्रस्त विधाने करू नयेत अथवा व्हाट्सअप स्टेटसला वादग्रस्त होईल असे स्टेटस ठेवू नये असे आवाहन तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी केले आहे.
