अहमदनगर प्रतिनिधी (दि.२ एप्रिल):-कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय मॅन ऑफ द एक्सलन्स अवॉर्ड 2023 पुरस्कार अहमदनगरचे सुपुत्र तसेच आपल्या चित्रकलेने सर्वांना भुरळ पाडणारे चित्रकार व कलाशिक्षक श्री.दत्तात्रय किसनराव आडेप यांना प्रदान करून गौरविण्यात आले.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ संगीत दिग्दर्शक/संगीतकार मधुकर रेडकर,तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री सविता हांडे,हास्य जत्रा फेम कॉमेडी किंग जॉनी रावत,गीतकार ऍड.समृद्धी पवार व शिक्षण अधिकारी एस.बी.माळी इत्यादी होते.कराडी समाज हॉल कामोठे,सेक्टर 14 नवी मुंबई येथे मोठया उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला.पुरस्कार मिळाल्या बद्दल श्री.आडेप सर यांचा मित्र परिवारातून तसेच नातेवाईक,अहमदनगर शहर परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

