अहमदनगर प्रतिनिधी (दि.३ एप्रिल):-तोफखाना पोलिसांनी गोमांस विक्री होत असलेल्या दोन दुकानावर छापा टाकून 20,400/- रु.किंचे गोमांस केले जप्त, अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये महावीर जयंती यादिवशी कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असताना देखील दिनांक ०३/०४/२०२३ रोजी कैलारु,शेमशेर बाजार, सर्जेपुरा येथे एका गाळ्या मध्ये इसमनामे इमरान मोहम्मद हनीफ कुरेशी(वय ३८,वर्षे रा.तांबोळी किराणा स्टोर जवळ, झेंडीगेट,जि अहमदनगर)हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीचे मांस विक्री करण्यास बंदी असताना देखील स्वतः कडे १) ८०००/- रुकिं.चे ४० किलो वजनाचे गोमांस प्रत्येकी २०० रु किं,२) २०००/- रु किं.चा एक लोखंडी वजनी काटा कि.अं. जु.वा, ३)२००/- रु कि.चा अंदाजे एक धारदार कु-हाड त्यास लाकडी दांडा असलेला कि.अं.जु.वा, ४)२००/- रुकिं.चा एक लोखंडी सत्तुर कि.अं.जु.वा असा एकुण १०,४००/- रु किं.चा गोमांस व इतर साहित्यासह मिळुन आला.तसेच दुस-या ठिकाणी दि.०३/०४/२०२३ रोजी कैलारु,शेमशेर बाजार, सर्जेपुरा येथे एका गाळ्यामध्ये इसमनामे रिजवान मुश्ताक बैवपारी(वय २२ वर्षे,रा.तांबोळी किराणा स्टोर जवळ,झेंडीगेट,जि अहमदनगर) हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जातीचे मांस विक्री करण्यास बंदी असताना देखील स्वतः कडे १)८०००/- रुकि.चे ४० किलो वजनाचे गोमांस प्रत्येकी २०० रु किलो प्रमाणे किंमत अंदाजे २) २०००/- रु किं.चा एक इलेक्ट्रिक वजनी काटा कि.अं.जु.वा.३)२००/- रु किं.चा एक लोखंडी सत्तुर कि.अं.जु.वा असा एकुण १०,२००/- रु किं.चा असा दोन ठिकाणाहुन २०,४००/- रु किं.चा गोमांस व इतर साहित्य गुन्ह्याच्या पुढील तपासकामी जप्त करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री.राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर श्री.अनिल कातकाडे यांचे सुचना व मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे तोफखाना तपास पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितिन रणदिवे,पो.उप.निरी.समाधान सोळंके,पोहेकॉ/डी बी जपे, पोहेकॉ/सुनिल शिरसाठ, पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसिमखान पठाण, पोना/अहमद इनामदार,पोना/ संदिप धामणे,पोना/सुरज वाबळे,पोकॉ/सचिन जगताप/ पोकॉ/सतिष त्रिभुवन,पोकॉ/ शिरीष तरटे,पोकॉ/दत्तात्रय कोतकर,पोकॉ/सतिष भवर, पोकॉ/गौतम सातपुते यांनी केली आहे.
