नगर प्रतिनिधी(दि.३ एप्रिल):-कोयत्याने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारा अटटल फरार व दोन गंभीर गुन्हे दाखल असलेला आरोपी कोतवाली पोलिसांनी केला जेरबंद, बातम्यातील सविस्तर हकीकताची की घटनेतील फिर्यादी नामे बाळासाहेब हरिभाऊ मतकर(वय ५० वर्ष, धंदा शेती,रा.मतकर मळा केडगाव देवी रोड,केडगाव, अहमदनगर) दि. २९/०९/२०२२ रोजी मतकर मळा,केडगाव,अहमदनगर येथे आरोपी हेमंत उर्फ आप्पा किसन मतकर याने त्याची मोटरसायकल फिर्यादी यांच्या मोटरसायकलला आडवी लावुन फिर्यादीस थांबवुन विनाकारण शिवीगाळ करून विनाकारण शिवीगाळ का करता असे विचारले असता आरोपी आरोपी हेमंत उर्फ आप्पा किसन मतकर यांने फिर्यादीचे डोक्यात जिवे ठार मारण्याचे उददेशाने कोयत्याने व आरोपी अ.क्र ०२ अशोक किसन मतकर पाहिजे आरोपी) याने काठीने मारहाण करून फिर्यादीस गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला व फिर्यादीच्या मुलास जीवे ठार मारण्याची धमकी दिली वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस ठाणे गु.र.नं ७६४/२०२२ भा.द.वि कलम ३०७,३२४,३४१,५०४,५०६, ३४ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे दि.३०/०९/२०२२ रोजी गुन्हा रजिस्टरी दाखल आहे.सदर गुन्हयातील आरोपी हे गुन्हा दाखल झाले पासून कोठेतरी फरार झाले होते. त्यापैकी आरोपी नामे हेमंत उर्फ आप्पा किसन मतकर, रा.मतकर मळा,केडगाव देवीरोड,केडगाव,अहमदनगर हा केडगाव देवी मंदीर परिसरात आल्याची गुप्तबातमी मिळाल्याने पो.नि/चंद्रशेखर यादव यांचे आदेशाने सपोनि/पिंगळे, पो.ना ८५९ मोहन भेटे,पो.ना २१९१ नकुल टिपरे,पो.ना ६२३ काळे असे केडगाव देवीमंदीर परिसरात रवाना झाले व त्यांनी आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हेमंत उर्फ आप्या किसन मतकर,रा.मतकर मळा, केडगाव देवीरोड,केडगाव, अहमदनगर हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार आरोपी अशोक किसन मतकर यांचे सह केल्याची कबुली दिल्याने त्यास वर नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/रविद्र पिंगळे,पो.ना ८५९ मोहन भेटे,पो.ना २१९१ नकुल टिपरे हे करीत आहेत.अटक आरोपीवर यापूर्वीचे कोतवाली पोलीस ठाण्यात शरीराविरुद्धचे 2020 मध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न करणे तर 2019 मध्ये दुखापत करणे असे 2 गुन्हे दाखल आहेत.सदरची कामगिरी श्री. राकेश ओला,पोलीस अधिक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे,अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,सहा.पोलीस निरीक्षक रविद्र पिंगळे,मोहन भेटे,नकुल टिपरे,गोरख काळे,सतीश भांड,रामदास थोरात,सुनील भिंगारदिवे,तनवीर शेख यांनी केली आहे.
