अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ एप्रिल):-एमआयडीसी पोलिसांनी अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला बिंगो नावाचा हारजितीचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाईत एकूण 2,76,580 रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत.दि.०४ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,अंजली वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ येथे पत-याचे शेडचे मध्ये इसम नामे दिपक घाटे हा बिंगो नावाचा हारजितीचा जुगार लोकांकडुन पैशे घेवून आकडयावर पैसे लावुन खेळत व खेळवित आहे.अशी माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी तात्काळ एक पथक तयार करुन पोना/चांगदेवआंधळे, पोना/पांढरकर,पोकॉ/सानप यांनी त्या ठिकाणी जावून अचान छापा टाकला असता, भोला वॉशींग सेंटर नागापुर कमानीजवळ येथे जावून खात्री केली असता तेथे एक इसम पत-याचे शेड मध्ये ० ते ९ आकडे लीहलेले कागद व समोर एलसीडी स्क्रीन लावलेली व त्याचे समोर तीन ते चार लोक उभे असलेले व त्याचे समोर एक ० ते ९ असे आकडे लिहलेले कागदी पान समोर ठेवून त्यावरील आकडयावर पैसे लावलेले दिसलेने एमआयडीसी पोलीस पथकाची खात्री होताच छापा टाकला असता उभे असलेले लोक पोलीस आल्याचे पाहुन पळुन गेले बसलेला इसमास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी जागीच पकडले व त्याचे नाव विचारता त्याने त्याचे नाव दिपक निळकंठ घाटे(वय ४० रा.नागापुर अ.नगर) असे सांगीतले.त्याची झडती घेतली असता,त्याचे कब्जात बिंगो जुगाराचे साधने मिळुन आले ते खालील प्रमाणे
१)१३८०/- रु रोख त्यात १००,२०,१० रु दराच्या चलनी नोटा
२)२,६०,०००/००रु की.ची स्वीप्ट गाडी नं.एम एच १२ ई एम ८६९५
३) २००/०० रु की.चा एक ० ते ९ आकडे लिहलेला कागद
४) १५,०००/०० रु की ची सनसुई कंपनीचा एलसीडी
२,७६,५८०/- रु एकुण
पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी आरोपी दिपक घाटे यास स्विप्ट गाडी कोणाची आहे. याबाबत विचारपुस करीता त्याने सदर स्विप्ट गाडी हि मीच बिंगोची स्क्रीन व साहित्य आणने नेणे करीता वापरतो असे सांगीतले.वरिल वर्णनाच्या व किंमतीच्या मुदद्देमालासह आरोपी दिपक निळकंठ घाटे वय ४० रा. नागापुर अ.नगर हा मिळुन आरोपी व मुददेमाल ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप,पोलीस अंमलदार पांढरकर,पोना/आंधळे,पोकॉ/सानप आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
