नागपूर प्रतिनिधी(रवींद्र खेडकर):-नुकत्याच पार पडलेल्या ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून १९ मार्च रोजी घेण्यात आलेल्या सांगली येथे कार्यक्रमात सिटी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हाध्यक्षपदी प्रियंका चव्हाण यांची निवड करण्यात आली.त्यांची निवड सिटी इंडिया मराठी न्यूज संपादक तुकाराम सुतार सिटी फाउंडेशन सांगली जिल्हा अध्यक्ष नीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली,असून सांगली जिल्ह्याचे महापौर दिग्विजयशी सूर्यवंशी व डॉ.आशा गाजी यांच्या हस्ते प्रियंका चव्हाण यांना महिला दिनाचे सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाला नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर, मुंबई उपसंपादक हसमुख मकवाना,सिटी फाउंडेशन नागपूर जिल्हाध्यक्ष मंगला खेडकर,सांगली जिल्हा प्रतिनिधी कुलदीप भाटिया, मुंबई उपसंपादिका प्रीती जाधव,नागपूर जिल्हा प्रतिनिधी राजू नानवटकर, अतुल सुतार शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रियंका योगेश सिंग चव्हाण या कमी वयात तीन पदाच्या मानकरी ठरल्या आहे सर्वप्रथम केंद्रीय मानवाधिकार सुरक्षा संघटन दिल्ली,जळगाव जिल्हा अध्यक्षपदी एक वर्ष आधी त्यांची ही निवड करण्यात आली,त्यानंतर सिटी इंडिया मराठी न्यूज उपसंपादिका आणि सिटी फाउंडेशन जळगाव जिल्हा अध्यक्षपदी त्यांची एकमतांनी निवड करण्यात आली.तसेच त्या शिक्षिका असून अनेक कला त्यांच्या अंगी आहेत त्यांना गायन,नृत्य,ढोल वाजवणे अशा अनेक प्रकारच्या कला त्यांच्यात आहे.मूकबधिर शाळांना भेटी देणे त्यांच्या व्यथा जाणून घेणे हे त्यांचे समाजकार्य आहे त्यांचे शिक्षण बीएड झाले असून कोणतेही कामात त्यामागे नाही हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे त्या वनदेवी साधिका आश्रम संचालिका अर्पिता मानस भारती यांच्या त्या शिष्य आहेत हि पण त्यांची ओळख आहे.त्यांच्या या निवडीने परिसरातील नागरिक उत्सव साजरा करत आहे.
