अहमदनगर प्रतिनिधी(दि.६ एप्रिल):-दि.५ एप्रिल २०२३ रोजी नवनाथ आनंदा काळे, (वय-३७ वर्षे,धंदा-टायर पंक्चर दुकान,रा- स्वामी समर्थ नगर,तपोवन रोड जि.अहमदनगर) यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की,दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०:३० वा.चे सुमारास माझे दोन्ही मुले शाळेत गेली व मी टायरचे दुकानावर गेलो तसेच माझी पत्नी संस्कार कलेक्शन कपडयाचे दुकानावर गेली. त्यावेळी बाहेर जाताना माझे पत्नीने आमचे घराचे दरवाजाला व्यवस्थित लॉक लावले होते.त्यानंतर दुपारी १२:१५ वाजण्याच्या सुमारास मला माझी पत्नी प्रतिक्षा हिचा फोन आला व तीने मला सांगितले की,आपला मुलगा सोहम दुपारी १२:०० वाजनेच्या सुमारास आपले घरी जावुन लगेच माझेजवळ कपडयाच्या दुकानावर आला व त्याने मला सांगीतले की,आपले राहते घराचे दरवाजाचा कडी कोंडा कोणीतरी तोडलेला आहे.व तुम्ही लवकर घरी या.मी घरी चालले आहे असे सांगितल्यावर मी लगेच आमचे घरी गेलो.त्यावेळी आमचे घराचा दरवाजाचा कडी कोंडा तुटलेला दिसला व दरवाजा उघड होता.त्यानंतर मी घरात जावुन पाहीले असता दोन्ही बेड चे दरवाजाचे कुलूप तुटलेले होते. त्यातील समोरच्या बेडमध्ये ठेवलेले लाकडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसला त्यावेळी मी कपाटाच्या ड्राव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागीने,व रोख रक्कम पाहीली असता मला ती दिसुन आली नाही.तेव्हा मी घरामध्ये माझे दागिन्यांचा व पैशांचा शोध घेतला असता ते कोठेही मिळुन आले नाही.यांनतर माझी खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे दागिने व रोख रक्कम चोरुन नेले आहे.फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे ४४ हजार रुपये,११ ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस किंमत साधारण ६४ हजार रुपये, १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील झुमके १.८ लक्ष-रुपये चे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण,४० हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची अंगठी व ५० हजार रुपये रोख रक्कम असा एकुण ३ लाख ६ हजार एकुण रुपये किमतीचा ऐवज चोरी गेला आहे.यांनतर पिडीत काळे यांनी अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीची फिर्याद दिली आहे.
