Maharashtra247

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिसांनी केली अटक मुलगी सुखरूप;महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके यांच्या अथक प्रयत्नांना आले यश

 

अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ एप्रिल):-दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेणाऱ्या आरोपीस एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके यांनी तपास करून आरोपीस केली अटक,घटनेतील सविस्तर माहिती अशी की दि.01/04/23 रोजी एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दिमधून 10 वी मधे शिक्षण घेत असणाऱ्या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अपहरण केलेचा गुरन 283/23 ipc 363, 366अ प्रमाणे गुन्हा दाखल होता.त्या अनुषंगाने सपोनि/राजेंद्र सानप यांनी Psi जोती डोके, PC नवनाथ दहिफळे,PC किशोर जाधव यांचे पथक तयार केले,PSI ज्योती डोके यांनी अथक परिश्रम करून कसलाही पुरावा मिळून येत नसताना गोपनीय माहिती मिळवून शिर्डी येथून आरोपी शुभम शरद गायकवाड (रा.बोल्हेगाव) यास ताब्यात घेतले व अल्पवयीन मुलीस पालकांच्या ताब्यात दिले.सदर आरोपी शुभम शरद गायकवाड यास दि.08/04/23 रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील,स.पो.नि/राजेंद्र सानप यांचे मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती डोके,पोलीस अमलदार नवनाथ दहिफळे,किशोर जाधव यांनी केलेली आहे.

You cannot copy content of this page