सातारा शहरातील गंभीर गुन्हे करणारी सराईत टोळी तडीपार
सातारा प्रतिनिधी(प्रतिभा शेलार):-सातारा शहरात गर्दी मारामारी,गंभीर दुखापत,शिवीगाळ दमदाटी,जबरी चोरी,घरात घसुन दुखापत करणा-या टोळीचा प्रमुख १)सौरभ ऊर्फ लाल्या नितीन सपकाळ,वय २३ वर्षे, रा.रघुनाथपुरा पेठ,सातारा ता.जिसातारा २) ओंकार रमेश इंगवले,वय २७ वर्षे,रा.देशमुख कॉलनी करंजे पेठ,सातारा ता.जि.सातारा (टोळी सदस्य) ३)मंदार हणमंत चांदणे,वय ३२ वर्षे, रा.७४१, गुरुवार पेठ, सातारा ता.जि.सातारा (टोळी सदस्य) यांना जिल्हयातुन तडीपार करणे बाबत सातारा शहर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी,पोलीस निरीक्षक श्री.बी.बी. निंबाळकर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम ५५ अन्वये प्रस्ताव सादर केला होता.त्याची चौकशी श्री एम. डी. शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग यांनी करुन त्याचा अहवाल मा.हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांना सादर केला होता.प्रतिबंधक कारवाई करुनही सदर टोळीच्या संशयित हालचालीस प्रतिबंध झालेला नाही.त्यांचे कृत्यांमुळे सर्व सामान्य नागरीकांचे फार मोठे आर्थिक व शारिरीक नुकसान झाले होते.हद्दपार यांना कायदयाचा धाक नसुन ते बेकायदेशीर कारवाया करीत आहेत. त्यांना सुधारणेची संधी देवुनही त्यांचे वर्तनात सुधारणा झाली नव्हती.त्यांचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. जनतेमधुन त्यांचेवर कडक कारवाई करणे करीता मागणी होत होती.म्हणुन त्यांना समीर शेख,हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ अन्वये ०३ इसमांचेवर दोन वर्षा करीता सातारा जिल्हा हद्दीतुन हद्दपारचा आदेश केला आहे.नोव्हेंबर २०२२ पासुन ०६ उपद्रवी टोळयांमधील १६ इसमांना तडीपार करण्यात आले आहे.भविष्यातही सातारा जिल्हयामधील सराईत गुन्हेगारांचे विरुध्द हद्दपारी,मोक्का,एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाचे वतीने अपर पोलीस अधीक्षक,श्री.बापु बांगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अरुण देवकर,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक,श्री.मधुकर गुरव, पोना/प्रमोद सावंत,पोकॉ/ केतन शिंदे,म.पो.कॉ.अनुराधा सणस,यांनी या कारवाई साठी योग्य पुरावा सादर केला.या कारवाईचे शहरातून समाधान व्यक्त होत आहे.