शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ७ एप्रिल रोजी जॉब फेअरचे आयोजन
अहमदनगर प्रतिनिधी(दि.६ एप्रिल):-शुक्रवार दिनांक ७ एप्रिल २०२३ रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूल सहकार सभागृह समोर, स्टेशन रोड,अहमदनगर येथे शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने युवकांना नोकरी मिळावी या हेतूने या नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.अहमदनगर,सुपा, चाकण,व विविध शहरातील ३० कंपन्याचा सहभाग असणार आहे.आय टी, इंडस्ट्रियल,फायनान्स, इंजिनीरिंग,मेडिकल , मार्केटिंग,सेल्स,मीडिया अश्या विविध क्षेत्रातील नामवंत कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभाग घेणार आहे.या जॉब फेअरमध्ये शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध असून युवकांनी आपले बायोडाटा घेऊन समक्ष इंटरवीव्ह देऊन नामाकिंत कंपनी मध्ये नोकरी मिळविण्याची संधीचे सोने करण्याचे आवाहन एकता फौंडेशन मार्फत करण्यात आले आहे.या जॉब फेअर मध्ये सहभागी होण्यासाठी ७०३०३०३०४४ किंवा ७०२०५५३५२३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच खलील लिंक वर गुगल फॉर्म भरून सहभागी व्हावे.
https://forms.gle/TDxnXmdinxzgVBFZ6