अहमदनगर प्रतिनिधी दि.७ एप्रिल):-दिवसा घरफोडी चोरी करणाऱ्या चोरट्याला २४ तासाच्या आत जर बंद करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे. घटनेतील हकीकत आशिकी यातील फिर्यादी श्री.नवनाथ काळे रा.समर्थ नगर,तपोवन रोड अहमदनगर यांनी दि.५ एप्रिल २०२३ रोजी कोणीतरी अज्ञात इसमानी कडी कोंडा तोडून घरातील ३,०६,०००/-रुपयाचे सोन्याचे दागीने चोरून नेले आहे.दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३८०/२०२३ भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावरुन यातील फिर्यादी यांनी दिलेल्या वर्णनावरून सदर गुन्हयातील आरोपी नामे राहुल मोहन फाटक (वय २० वर्ष रा.कांबी ता.शेवगाव जिल्हा अहमदनगर) यास २४ तासात अटक करण्यात आले असुन आरोपीस तपोवनरोड येथुन ताब्यात घेतले असता,आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली देवून गुन्हयातील चोरी केलेला मुद्देमाल आरोपी याने काढून दिल्याने गुन्हयाचे तपासात जप्त केला आहे.
१) फिर्यादी यांच्या पत्नीचे ४४,०००/- रु किचे गळयातील सोन्याचे नेकलेस जुवा
२) ६४,०००/- रु कि थे १६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले जुवा
३) १२,०८,०००/- रु कि चे २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जुवा
४) ४०,०००/- रु किची सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची जू या
५) ११,५००/- रु रोख रक्कम
६) १,००,०००/- एक अॅक्सेस कंपनीची मोपेड मोटार सायकल विना क्रमांकाची
३,६७,५००/- रु येणे प्रमाणे
सदरची कामगीरी ही श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिल कातकडे उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ श्री.मधुकर साळवे,सपोनि/श्री.नितीन रणदिवे,पो.स.ई श्री.समाधान सोळंके,पोहेकॉ/दत्तात्रय जपे,पोहेकॉ/सुनिल शिरसाट,पोना/संदिप धामणे,पोना/सुरज वाबळे,पोना/अविनाश वाकचौरे,पोना/वसीम पठाण, पोना/अहमद इनामदार,पोकॉ/ दत्तात्रय कोलकर,पोकॉ/शिरीष तरटे,पोकॉ/सतीष भवर,पोकॉ/सतीष त्रिभुवन, पोकॉ/सचीन जगताप,पोकॉ/गौतम सातपुते,पोकॉ/चेतन मोहीते यांनी केली आहे.
