पुणे प्रतिनिधी (दि.७ एप्रिल):-पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे दि.६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या जन्मोत्सवा दिवशी नृत्यांगना गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला होता.दरम्यान नारीशक्ती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सौ.शारदा भुजबळ यांनी शिरूर पोलीस स्टेशन निरीक्षक यांना दि.५ एप्रिल रोजी निवेदन दिले होते.की नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमास परवानगी नाकारावी,हनुमान हे ब्रह्मचारी असून त्यादिवशी गौतमी पाटील सारख्या नृत्यांगणीचा नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवणे योग्य होणार नाही.सौ.शारदा भुजबळ या कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारावी म्हणून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दि.६ एप्रिल रोजी सकाळ पासून ठाण मांडून होत्या.त्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत शिरूर पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास अखेर परवानगी नाकारली.तसेच पोलीस प्रशासनाचा आदर करत अण्णापूर गावातील ग्रामस्थांनी मनाचा मोठेपणा दाखवून गौतमी पाटीलला कार्यक्रमास बोलवले नाही,याचेही सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.शिरूर पोलीस प्रशासनाने केलेल्या कामगिरीचे शारदा भुजबळ यांनी आभार मानले.
