पुणे प्रतिनिधी:-पुणे ग्रामीण शिरूर शिरूर येथील आण्णापूर गावात हनुमान जयंती निमित्ताने गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.तो कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे गौतमी पाटील हिचा कार्यक्रम होऊ नये म्हणून महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी शिरूर पोलिसांना निवेदन पाठवून दिले होते की धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशा असलीन डान्स करणारी धरतीचे कार्यक्रम होऊ नये त्या निवेदनाची दखल घेऊन शिरूर पोलिसांनी हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी परमिशन नाकारले व तो कार्यक्रम रद्द झाल्या ‘सबसे कातील गौतमी पाटील’ या डायलॉगची सध्या चांगलीच हवा पाहायला मिळत आहे.विविध लावण्यांवर धमाकेदार नृत्य करत सर्वांनाच वेड लावणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील होय.ग्रामीण भागात सध्या गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आहे.गावातील विविध कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याची झलक पाहायला मिळत आहे.पण ज्याठिकाणी प्रसिद्धी येथे तिथे वाद हा आपसूकच येतो.गौतमी कधी आपल्या नृत्यामुळे तर कधी आपल्या आक्षेपार्ह हावभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते.ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रा,वाढदिवस,विविध कार्यक्रमांचे उदघाटन यामध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याची मागणी वाढत आहे. लाखोंमध्ये पैसा खर्च करुन आयोजक गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. तरुणाईच नव्हे तर प्रत्येक वयोगटातील लोक गौतमीच्या नृत्यावर भान हरपून नाचताना दिसून येत आहेत.मात्र यामध्ये अनेक राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत.नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील अन्नापुर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी निवेदनाद्वारे कार्य धार्मिक कार्यक्रमांमध्ये असले अश्लील नृत्य करणाऱ्या गौतम पाटील चे कार्यक्रम होऊ नये म्हणून निवेदन मेलद्वारे पाठवून दिलेले व त्याचा पाठपुरावा करत होत्या त्या निवेदनाची दखल घेऊन शिरूर पोलिसांनी तो कार्यक्रम रद्द करून त्यांना परवानगी नाकारली. शिरुर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐन कार्यक्रम सुरू करण्याच्या वेळी कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली .गुरुवारी रात्री शिरुरच्या अन्नापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सप्रतिबात शेलार यांचे निवेदन कार्यक्रम थांबवण्यासाठी केले होते त्या निवेदनाची दखल घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवरती गौतमी पाटीलचा कार्यक्रम ताबडतोब रद्द करण्याची वेळ आली.मोठी रक्कम घेऊन आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊनही गौतमी पाटीलला परफॉर्म करता आलं नाही.या वेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं.हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे.
