शेवगाव प्रतिनिधी(दि.८ एप्रिल):-शेवगाव तालुक्यातील मजले शहर येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास नराधम कारभारी ज्ञानदेव लोढे या सासऱ्याने स्वतःच्या मुलाच्या एक वर्ष ११ महिन्याच्या मुलीचा { नातीचा } व पाच महिन्याची गरोदर असलेल्या सुनेचा खून केल्याची घटना घडली आहे.ऋतुजा संतोष लोढे (वय २२ ) व समृद्धी संतोष लोढे वय ( १वर्ष ११ महिने )अशी खून झालेल्या दुर्दैवी मृतांची नावे आहेत .या संदर्भात मृत युवतीचे चुलते जनार्दन नारायण मगर वय ५० वर्ष,धंदा शेती रा. मजले शहर ता.शेवगांव जि. अहमदनगर) यांनी गुरुवारी रात्री ११.३५ वाजता तीचे सासरे कारभारी ज्ञानदेव लोढे वय ६० राहणार मजले शहर याच्या विरुद्ध शेवगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे .शेवगांवचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे पुढील तपास करीत आहेत.मगर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की फिर्यादीची पुतणी ऋतुजा संतोष लोढे हीच्या चारित्र्यावर संशय घेऊन आरोपी सासरा कारभारी लोढे मागील सहा महिन्यापासून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करीत होता.ती पाच महिन्यांची गरोदर असताना तिचा सासरा कारभारी लोढे याने ऋतुजाचा गळा दाबून जीवे ठार मारले आहे.तर तिची मुलगी समृद्धी लोढे या एक वर्ष ११ महिन्याच्या नातीला पाण्याने भरलेल्या प्लास्टिकच्या मोठ्या बकेटमध्ये बुडवून दाबून धरून जीवे ठार मारून टाकले आहे.या दुर्दैवी घटनेबाबत शेवगांव तालुक्यात आणि परिसरात अत्यंत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.शेवगावचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांचे मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल हे पुढील तपास करीत आहेत.
