अहमदनगर प्रतिनिधी(दि.८ एप्रिल):-भिंगार येथील नागरदेवळे सावता नगर माजी सैनिक सोसायटी येथे गेल्या ३ महिन्यापासून ड्रेनेज लाईन व रस्ता सिमेंट काँक्रेटचे काम चालू आहे परंतु अद्याप एकही काम व्यवस्थित पार पडले नाही.ड्रेनेज लाईनचे काम अर्धवट असून रोडचे काम चालू आहे.रोडचे काम चालू झाल्यापासून इंजिनीयर साहेबांनी या परिसरात एकदाही दर्शन दिले नाही. किंवा कामाची पाहणी केलेली नाही.दि.५ एप्रिल रोजी रोडवर खडी मुरूम टाकण्याचे काम चालू होते.त्यावेळी तेथील नागरिकांनी निरीक्षण केले की मुरूम मध्ये सर्व मातीच आहे. दि.६ एप्रिल रोजी नागरदेवळे येथील ग्रामसेवक यांना परिसरातील नागरिक प्रशांत पाटोळे यांनी फोनद्वारे माहिती विचारली असता, ग्रामसेवकांनी दिलेले उत्तर हे उडवाउडवीचे होते ते म्हणाले.इंजिनियर यांचा टेक्निकल प्रॉब्लेम आहे माझा काहीच विषय नाही असे म्हणून त्यांनी अंग झटकून इंजिनियर साहेबांचा नंबर दिला.सामाजिक कार्यकर्ते पाटोळे यांनी इंजिनीयर राऊत यांना फोन केला व त्यांना सावता नगर- नागरदेवळे माजी सैनिक सोसायटी या ठिकाणी निकृष्ट दर्जेचे काम चालू आहे.मुरूम मध्ये मुरूम कमी आणि मातीचे प्रमाण जास्त आहे असे इंजिनियर राऊत यांच्याशी बोलणे झाले यावेळी इंजिनीयर म्हणाले की मी माणसे पाठवतो.त्यानंतर पाटोळे यांना फोन आला व तुम्ही कोण पाटोळे बोलता का येथे साइटवर या पाटोळे हे साइटवर पोहोचले तेव्हा ठेकेदार गोरे यांनी त्यांना म्हटले की तुम्ही इंजिनियर साहेबांना फोन का केला तुम्ही आमच्या कामात डोकं लावू नका आम्हाला काय करायचे ते आम्ही पाहू अशी भाषा वापरली तसेच गोरे म्हणाले तुम्हाला मुरूम आणि मातीतला फरक कळतो का? गोरे म्हणाले की परत इंजिनियर साहेबांना फोन करायचा नाही काय असेल ते आम्ही पाहू अशा उद्धट भाषेत ते बोलत होते.अशी उडवाउडवीची उत्तरे ठेकेदार इंजिनियर यांच्याकडून मिळत असतील तर नागरिकांनी प्रशासनावर कसा विश्वास ठेवायचा?असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.सदर कामाची गुणवंता तपासून काम करावे अन्यथा या कामाबाबत परिसरातील नागरिक कायदेशीर कारवाईच्या तयारीत आहे .
