अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले तीन सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आगामी सण व उत्सव अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन सदरचे हद्दपार गुन्हेगार हद्दपार आदेशाचा भंग करुन अहमदनगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेश दिले होते.नमुद आदेशाप्रमाणे पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/राजेंद्र वाघ,संजय खंडागळे,भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/फकिर शेख,संदीप घोडके,दिनेश मोरे,संदीप पवार,सुरेश माळी,पोना/विशाल दळवी,संदीप चव्हाण, दिपक शिंदे,पोकॉ/विजय धनेधर,कमलेश पाथरुट यांचे अधिपत्याखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार यांचे पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.त्याप्रमाणे पथकातील अंमलदार हे अहमदनगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि,हद्दपार इसम नामे 1)सरवर ऊर्फ भिमा अस्लम शेख, 2)अतुल रावसाहेब दातरंगे, 3)अक्षय भाऊसाहेब मोढवे हे हद्दपार असताना लपूनछपून अहमदनगर शहरामध्ये वास्तव्य करीत आहेत.अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील अंमलदार यांनी नमुद हद्दपार इसमांचा शोध घेतला असता वरील इसम हे अहमदनगर शहरात विविध ठिकाणी मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले.नमुद हद्दपार गुन्हेगारांचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता,हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचे कडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे.वरील नमुद हद्दपार इसम हे हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या नगर शहर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द कोतवाली पोस्टे येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.पुढील कार्यवाही कोतवाली पोस्टे करीत आहे. सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.अनिल कातकाडे उविपोअ नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
