अहमदनगर प्रतिनिधी (दि.८ एप्रिल):-नगर तालुक्यातील पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद अण्णा मोकाटे यांना जामीन मंजूर, सन २०२१ मध्ये ३७६ तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार मोकाटे यांना अटक करण्यात आली होती.तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांच्याकडे तपास असताना त्यांनी अत्याचारासह अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दोषआरोप पत्र दाखल करण्यात केले होते.दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर देखील मोकाटे यांचे जामीनअर्ज न्यायालयाने फेटाळले होते.तर या प्रकरणा मध्ये मार्च २०२४ मध्ये न्यायालयात सुनावणी सुरू झाली होती.यावेळी ॲड. सतीष गुगळे हे आरोपीचे काम पाहत असतांना त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज सादर केला होता.त्यावर अखेर सुनावणी होऊन न्यायालयाने आपला निकाल देत गोविंद अण्णा मोकाटे यांना जामीन मंजुर केला.
