अहमदनगर प्रतिनिधी:-एमआयडीसी परिसरात 11 अवैध टपऱ्यावर पोलिसांनी टाकला छापा 11 जणांवर गुन्हे दाखल एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईत २७,२५८ /- रु एकूण रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात, शनिवार दि.८ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १२/१० वा.चे सुमारास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे एमआयडीसी येथील विखे पाटील कॉलेज नगर-मनमाड हायवे परिसरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एमआयडीसी परीसरात टपरीवर काही इसम हे महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेली सुगंधी तबाखुची विनापरवाना विक्री करत आहेत.आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकातील अंमलदार पोकॉ/किशोर जाधव,पोना/मच्छिंद्र पांढरकर,पोना/चव्हाण यांनी विखे पाटील कॉलेजच्या गेटसमोर तसेच सहयाद्री चौक,काकासाहेब म्हस्के कॉलेजचे गेटजवळ असे एकूण ११ ठिकाणच्या टपरीवर छापे टाकून झडती घेतली असता खालील प्रमाणे मुदद्देमाल मिळून आला आहे.
१) ४८,००/- रु किमतीचा ४ किलो तयार मावा इसम नाम गणेश बाळासाहेब घावटे याचे वैष्णवी पान टपरीमध्ये १२००/-रु. प्रत्येकी किलो किमतीचा.
२) २४०० /- रु किमतीचा २ किलो तयार मात्रा इसम नामे इमस नामे सचिन भाऊराव कोहीले याचे बेल्हेश्वर पान स्टॉल नावाचे टपरीमध्ये किं.अं.
३) ३६०० /- रु किमतीचा ३ किलो वजनाचा तयार मावा इसम नामे शुभम दत्तात्रय हजारे यांच ताब्यात मिळुन आला.
४) १५८४ रु किमतीचे विमल पानमसाला चे ८ पुडे प्रत्येकी किमंत १९८ रुपये प्रमाणे इसम नामे गणेश आण्णा शिंदे याचे गणेश पान सेंटर या टपरीमध्ये मिळुन आले
५) ३६०० /- रु किमतीचा ३ किलो तयार मावा इसम नामे लखन नानासाहेब कर्जुले याचे साई पान स्टॉल नावाचे टपरीमध्ये मिळुन आलेला.
६) २४३०/- रु किमतीच्या राजश्री पान मसालाचे ९ पुडे प्रत्येकी किमंत २७० रु प्रमाणे इसम नामे मनोज यशवंत कागुणे याचे आदीत्य टपरीमध्ये मिळुन आला.
७) १२०/- रु किमतीचा १ गोवा पानमसालाचा १ पुडा इसम नामे पंकज किशोर आकडकर याचे ताब्यात मिळुन आलेला,
८) १४४ /- रु किमतीचे प्रिमीयम एक्सल नावाची सुगंधी तंबाखुचे ३ पुडे प्रत्येकी किमंत ४८ रुपये प्रमाणे इसम नामे धनराज अनिल मासुळे याचे प्रणव पान स्टॉल नावाचे टपरीमध्ये मिळुन आलेले.
९) २४०० /- रुपये किमतीचा २ किलो तयार मावा इसम नाम गणेश प्रकाश निमसे याचे ताब्यात मिळुन आलेला,
१०) १८०/- रु किमतीचे बॅल्क लेबल नावाची सुगंधी तंबाखुच्या ६ पुडे प्रत्येकी किमंत ३० रु प्रमाणे इसम नामे विजय • उर्फ भोल्या सिंग हरीद्र सिंग याचे महाकाल टपरीमध्ये मिळून आल्या.
११) ६०००/- रु किमतीचा पाच किलो वजनाचा तयार मावा इसम नामे अनिकेत संजय आरडे याचे राज पान स्टॉल नावाचे टपरीमध्ये.
एकूण माल २७, २५८ /- रु.चा,महाराष्ट्र राज्यात तयार करण्यास व विक्री करण्यास बंदी असलेले वरील वर्णनाची सुंगधी तंबाखु,तसेच तयार माव्याची विक्री करतांना मिळुन आले आहेत,त्यांचे विरुद्ध भादवि कलम २७२,२७३,१८८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकाने कारवाई केली.
