अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ एप्रिल):-कोतवाली पोलीस स्टेशन व संजयनगर पुनर्वसन प्रकल्प व बालभवन यांच्या संयुक्त विद्यमानाने संजयनगर सेवावस्तीमध्ये कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.चंद्रशेखर यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत संजयनगर बालभवन येथे कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाच्या माळीवाडा-आयुर्वेद चौकातील काटवन खंडोबा रस्त्यावर असलेल्या शहरातील प्रसिद्ध संजयनगर झोपडपट्टीचे पुनर्वसन करण्याचे काम सुरू झाले आहे.येथे राहणाऱ्या सर्वधर्मिय २९८ परिवारांना प्रत्येकी १ लाखात त्यांचे हक्काचे घर मिळून देण्यासाठी काम सुरू आहे.२९८ घरापैकी ३३ घराची सोसायटी तयार करून तेथील रहिवाशांना सुपूर्त केली आहे.या परिसरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल. यासाठी “कायदेविषयक जनजागृती” हा उपक्रम घेण्यात आला.यामध्ये पोलीस निरीक्षक यांनी बोलताना सांगितले की संजयनगर परिसरामध्ये गुन्हेगारी क्षेत्र हे जरी मोठ्या प्रमाणात असले तरी स्नेहालय संस्था आपल्या परिसरात काम करत असल्या कारणाने चांगला परिसर घडत आहे.कर्जत तालुक्याला काम केलेलं अनुभव शेअर करताना सांगितले की पारधी समाज शिक्षणाविषयी वंचित ठेवले जाते.छोटे छोटे चुकीमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत असतात यामुळे आपले आयुष्य उध्वस्त होऊ शकते. प्रत्येक समाजात चांगले लोक असतात.पण एक दोन लोकांमुळे पूर्ण समाजावर कलंक लागतो.प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना वाईट संगती पासून लांब ठेवले पाहिजे चुकीच्या गोष्टी करू नये असे मार्गदर्शन सतत पालकांनी केले पाहिजे असे ते म्हणाले.या कार्यक्रमासाठी चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक श्री.महेश सूर्यवंशी, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,उपनिरीक्षक मनोज कचरे,पोलीस अंमलदार अभय कदम,सौ.वैशाली चोपडा,श्री. किरण थोरात,कु.सार्थक चोपडा,राहुल कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे वरिष्ठ सामुदायिक प्रतिनिधी ऋतिक लोखंडे यांनी केले.कार्यक्रमाचे आभार सामुदायिक प्रतिनिधी सीमा जुनी यांनी केले.या कार्यक्रमात संपन्न होण्यासाठी संजय नगर पुनर्वसन प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक श्री.प्रवीण कदम आणि बाल भवन प्रकल्पाचे सौ.उषा खोल्लम यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.अंजली व्यास,कु.साहिल पठाण,सौ. शारदा न्यानपल्ली,श्री. अंबादास पोटे,श्री.विक्रम भगत,नीलोफर शेख, त्यांनी अथक परिश्रम घेतले.

