महाड प्रतिनिधी(दि.९ एप्रिल):-इतिहासात अजरामर झालेली धाडसी माता हिरकणी यांचे जन्मस्थान असलेल्या वाळसुरे गावच्या सोमजाई माता महिला भजन मंडळाचा भव्य सत्कार समारंभ कोळोसे गावात करण्यात आला.महाड तालुक्यात सुश्रावाणीय महिला भजनाचे डबलबारीचे अनेक कार्यक्रम होत असतात त्यांच्या भजनामुळे अनेक समाजप्रबोधन चांगले बोध जीवनाला मार्गदर्शक व विचार समाजाला मिळतात.तसेच आनंद, मनोरंजनहि मिळते, गायिका सारीका संतोष गांगण,मृदुंगमणी सोहम सुनील गांगण,कल्पना गांगण, दिपाली जोष्टे,रश्मी देवळेकर, कुंदा जोष्टे,शारदा कोळेकर, मनीषा जोष्टे,राजश्री चव्हाण, लीना गांगण,प्रेमलता जैतपाळ,अलकनंदा जोष्टे, संतोष गांगण,सुनील गांगण, संतोष जोष्टे,रामचंद्र ठुले, संतोष लाड,गीता पवार,यांची टीम समाजात भजनाच्या माध्यमातून चांगले बदल घडावे ह्यासाठी अनेक त्याग करून नवनवीन कल्पना योजून मेहनत घेत असतात.त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन कोळोसे गाव येथे डबलबारीच्या कार्यक्रमात नथुराम लाले,प्रवीण सुतार, भागुराम सुतार,यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून भावी उज्वल यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या,त्यांच्या या सत्कराबद्दल अनेक माध्यमातून कोतुक करण्यात आले आहे.
