कोल्हापूर प्रतिनिधी दि.९ एप्रिल):-पोलीस मित्र असोशिएयनच्या वतीने महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शेलार यांना महिला आदर्श पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.हा पुरस्कार कोल्हापूर येथे शाहू स्मारक सभागृह, दसरा चौक येथे प्रदान करण्यात येणार आहे.प्रतिभा शेलार या सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात समाजातला विषय असो किंवा राज्याचा असो किंवा देशाचा असो किंवा घरगुती हे सर्व विषय घेऊन प्रशासनाची लढणे हे प्रतिभा शेलार करत असतात सर्वात जास्त त्या भारताच्या संविधानावर कार्य करतात,पिडीत व्यक्तीला न्याय व हक्क मिळवून देण्याचे त्या कार्य करत असतात.देशातील शासकीय अधिकारी किंवा सरपंच यांना भारताचे संविधान भेट देऊन त्यांचा शेलार मॅडम कायम सत्कार करतात.या कार्याने प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याला भारताच्या संविधानाची आठवण राहील हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. तसेच झाडे लावा व झाडे जगवा हा उपक्रम ही वर्षभर जिल्ह्यात राबवतात. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिभा शेलार यांच्यावर गर्व आहे त्यांच्यासारखे कार्य प्रत्येक महिलेने किंवा समाजातल्या प्रत्येक नागरिकांनी केलीच पाहिजे अशी त्यांची धारणा आहे.या त्यांच्या कार्याची दखल घेत पोलीस मित्र असोशिएयनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
