अहमदनगर प्रतिनिधी (दि.९ एप्रिल):-जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी रविवार दि.९ एप्रिल२०२३ रोजी सकाळी मतदान झाले.व संध्याकाळी मतमोजणी होऊन निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पोलीस अंमलदार रेवननाथ दहिफळे व संदीप घोडके यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय झाला.सोसायटीचा कारभार ऑनलाईन पद्धतीने करण्यासह कर्ज मर्यादा वाढवण्यात आली.तसेच कर्ज मंजुरीचा कालावधी देखील कमीत कमी करण्याचं अभिवचन परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी दिलं होतं.जिल्हा पोलीस क्रेडिट सोसायटीतर्फे देण्यात येणाऱ्या कर्जाला विमा संरक्षण देण्यासह जामीनदाराला टेंशन मुक्त करण्याचे अभिवचन देखील परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांनी दिलं होतं.यावर सोसायटीच्या सभासदांनी विश्वास ठेवला आणि परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय मिळवून दिला.
विजय उमेदवार पुढीलप्रमाणे

