सोनई प्रतिनिधी:-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सोनई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक माणिक चौधरी,तलाठी विजय जाधव,ग्रामसेवक संदीप वाडेकर व राज्य वितरणचे प्रतिक सरोदे यांनी बुद्धवंदना घेऊन पुष्पहार घालून अभिवादन केले.या प्रसंगी आर.पी.आय.चे जेष्ठनेते विजय जगताप, भीमरत्न सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष उदय करड़क,अमोल सालवे, अरबात शेख,सोमनाथ जाधव,सरपंच धनंजय वाघ,युवानेते प्रकाश शेटे,माजी सरपंच राजेंद्र बोरुड़े,माजी सरपंच दादासाहेब वैरागर,ग्रा.सदस्य सुनील तागड़, संतोष दरंदले,सचिन पवार, किशोर वैरागर,प्रभाकर गडाख,शकील बागवान, संतोष तेलोरे,नजीर सय्यद,सुभाष शिरसाठ, दिलीप काका शिंदे,सनी साळवे,मुकेश साळवे,सुधीर वैरागर,सागर वैरागर,अरविन्द गायकवाड़,प्रकाश पाडळे, रमेश पवार,भाऊसाहेब गायकवाड,राजेंद्र दोन्दे,रविंद्र जगताप,प्रकाश काकड़े,सचिन वैरागर आदि आंबेडकरी चळवळ येथील कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी सनी साळवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
