विजेचा धक्का बसून शेतकर्याचा मृत्यू
संगमनेर प्रतिनिधी (दि.१७ एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यातील निळवंडे शिवारात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.शेतातील डाळिंब बागेला औषध मारत असताना इलेक्ट्रिक लाईटच्या तुटलेल्या तारेमुळे विजेचा धक्का बसून शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना रविवार दि.16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. विजय साहेबराव पवार (वय 46) असे मृत्यू झालेल्या शेतकर्यांचे नाव आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने निळवंडे गावावर शोककळा पसरली आहे.याप्रकरणी भाऊसाहेब रामनाथ पवार (रा.निळवंडे) यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विष्णू आहेर अधिक तपास करत आहेत.