अहमदनगर प्रतिनिधी(दि.१७ एप्रिल):-आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन ॲपद्वारे बेटींग (सट्टा) मोबाईलवरुन घेणारा इसम बोल्हेगांव येथे ५५,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे.श्री.राकेश ओला पोलीस अधिक्षक,अहमदनगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर,स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर हे अवैध धंद्यांची माहिती घेत असतांना गुप्तबातमीदाराकडून माहिती मिळाली की,नवनाथ नगर,बोल्हेगांव येथे इसम नामे गोरख सुद्रीक हा घरासमोर बसुन त्याचे मोबाईल फोनवर JAQK777 या ऑनलाईन साईटवर आयपीएल क्रिकेट मॅचवर बेकायदा पैसे लावुन सट्टा खेळत व खेळवित आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे,संदीप पवार,पोना / लक्ष्मण खोकले अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन मिळालेल्या बातमीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश दिले.पथकातील पोलीस अंमलदार यांनी स्थानिक पोलीस व पंचाना सोबत घेवुन बातमीती नमुद ठिकाणी नवनाथ नगर, बोल्हेगांव,ता.नगर येथे जावुन खात्री केली असता एक इसम घरासमोर बसुन त्याचे मोबाईल फोनवर काहीतरी खेळताना दिसला पथकाने त्यास जागीच पकडुन पोलीस पथक व पंचाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव १)गोरख मच्छिंद्र सुद्रीक,वय २६,रा. नवनाथनगर,बोल्हेगांव,ता.नगर असे असल्याचे सांगितले.सदर इसमाचे हातातील मोबाईलची पहाणी केली असता त्याचे मोबाईल फोनमध्ये JAQK777 ही ऑनलाईन साईट/अॅप सुरु असल्याचे व त्या अॅपव्दारे आयपीएल किकेट मॅचवर सट्टा लावुन गेम खेळत असल्याचे दिसुन आल्याने त्यास हातातील मोबाईल फोनसह ताब्यात घेतले. सदर इसमास ऑनलाईन साईट/ॲप बाबत विचारपुस करता त्याने त्याचा साथीदार नामे २)प्रविण गिते,रा.तुळजाभवानी मंदीरा समोर, पाईपलाईन रोड,अहमदनगर याने JAQK777 या ऑनलाईन साईट/ॲपचा युझर आयडी व पासवर्ड देवुन त्या आधारे आयपीएल क्रिकेट सट्टा खेळतो व खेळवितो अशी माहिती दिल्याने त्याचा दिले पत्त्यावर जावुन शोध घेतला परंतु तो मिळुन आला नाही.ताब्यातील इसमाची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत ५५,०००/- रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनी २२-Ultra मॉडेलचा ॲन्ड्रॉईड मोबाईल फोन मिळुन आल्याने मोबाईल जप्त करुन आरोपी विरुध्द पोहेकॉ/४४० संदीप कचरु पवार,ने.स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. ५२८/२०२३ महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील कायदेशिर कार्यवाही तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,अहमदनगर व श्री.अनिल कातकाडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
