श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.४ मे):-शहरातील प्रसिद्ध उद्योजक व फुले आंबेडकर विचार मंचचे पदाधिकारी बापू माने यांच्यासह त्यांच्या मुलावर व भावावर दि.३ मे २०२३ रोजी प्राणघातक हल्ला झाला असून लिंपनगाव येथे घडलेल्या जमिनीच्या वादातून तेथे जमलेल्या जमावाने तलवार,काठ्या आणि गजाच्या सहाय्याने माने बंधू यांच्यावर हल्ला केला.त्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून लिंपणगाव पासुन एक किलोमीटरपर्यंत माने यांचा त्या प्रक्षोभक जमावाने पाठलाग केला.व शिवाय ते घेऊन गेलेल्या TATA HARIAR गाडीवर ट्रॅक्टर घालून त्या गाडीचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.जमाव पाठलाग करताना जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या माने यांना एका स्विफ्ट चालकाने मदत केली.त्यावेळी ते श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोहोचले.या घडलेल्या घटनेनंतर बाप्पु माने यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.त्यानूसार सात इसमावर भादवीक ३०७,३२४,१४३, १४८,१४९,४४७,४२७ नुसार संतोष माणिक भोंडवे,सागर भिकाजी भोंडवे,प्रसाद माणिक भोंडवे,संदीप किसन सुर्यवंशी,किरण भिकाजी भोंडवे,प्रविण सोपान कुरुमकर,सर्व राहणार लिंपनगाव,श्रीगोंदा व बापू लक्ष्मण कुरूमकर राहणार मुंढेकर वाडी,श्रीगोंदा यांच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
