अहमदनगर प्रतिनिधी (दि.४ मे):-शिवनेरी चौक रेल्वेस्टेशन रोड आयकॉन पब्लिक स्कूल जवळ घटनेतील आरोपी पतीने पत्नीला जीवे ठार मारून नंतर स्वतःघरात गळफास घेतला,कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन घराचे दरवाजे बंद होते दरवाजे तोडून दोन्ही बॉडी सरकारी दवाखाना येथे रवाना केल्या.प्राथमिक माहितीनुसार मयताचे नाव -1) संदीप रामचंद्र गुजर वय 53 वर्ष 2) सौ.आशा संदीप गुजर वय 50 वर्ष दोन्ही राहणार आयकॉन पब्लिक स्कूल जवळ शिवनेरी चौक स्टेशनरोड असे आहे.पतीने प्रथम पत्नीला जीवे ठार मारून नंतर स्वतःघरात गळफास घेतला अशी प्राथमिक माहिती समजतेय,कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
