प्रतिनिधी(दि.४ मे):-सामाजिक कार्यात आपल्या कामाने ठसा उमठवणाऱ्या शिवसेना महानगरप्रमुख ज्योतीताई शिवदे यांची भोई समाज महिला क्रांती दलाच्या नाशिक विभाग महिला अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.ज्योतीताई शिवदे यांनी शिवसेना(शिंदे गट) पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहे.या कार्याची दखल घेऊन त्यांची नाशिक विभाग महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली.भोई समाज क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश लोणारे,अर्जुन भोई प्रदेश महासचिव,राहुल हरसुले प्रभारी प्रदेशाध्यक्ष तसेच महिला प्रदेशाध्यक्ष अलका घाटे यांच्या सहीनिशी सौ.ज्योतीताई शिवदे यांना हे नियुक्तीपत्र दि.४ मे रोजी देण्यात आले.यावेळी ज्योतीताई शिवदे म्हणाल्या की माझ्यावर भोई समाज क्रांती दलाने जी जबाबदारी दिलेली आहे तीला कधीच तडा न जाऊ देता समाजातील बंधू-भगिनींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी या पदाचा उपयोग करणार आणि पदाच्या माध्यमातून 24 तास समाजासाठी उपलब्ध राहणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
