श्रीगोंदा प्रतिनिधी(दि.६ मे):-श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाणे हद्दीत मानवी तस्करी आणि वेठबिगारीवर बेलवंडी पोलिसांनी धडक कारवाई करीत ४ जणांची सुटका केली.या दकारवाईने वेठबिगारी करून घेणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.ढवळगाव नजीक एका विहिरीतील पाण्यावर दोन दिवसांपूर्वी एका अनोळखी दिव्यांग व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.या घटनेचा तपास करताना,बेलवंडी पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार,बेलवंडी पोलिस स्टेशनचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी पीएसआय राजेंद्र चाटे आणि पोलिस कर्मचाऱ्यांची स्वतंत्र तीन पथके तयार करून बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत वेठबिगारांची शोधमोहीम घेतली.खरातवाडी (ता. श्रीगोंदे) येथे पिलाजी कैलास भोसले याच्या ताब्यातून सलमान ऊर्फ करणकुमार (रा.छत्तीसगड) याची सुटका केली.घोटवी शिवारात बोडखे मळा येथे अमोल गिरीराज भोसले याच्याकडून ललन सुखदेव चोपाल (रा. बिहार) याची सुटका केली.घोटवी शिवारातील अशोक दाऊद भोसले आणि जंग्या गफूर काळे यांच्या तावडीतून भाऊ हरिभाऊ मोरे (रा.अंबेजोगाई, बीड) याची सुटका केली.या आरोपींना अटक करण्यात आली.चौकशीत त्यांनी यापूर्वी एका इसमास सुरोडी येथील मारुती गबुललाल चव्हाण यास ५ हजारांत विकल्याचे सांगितले.सुरोडी शिवारात जाऊन खात्री करून शव श्रीश (रा.कर्नाटक) याची सुटका करण्यात आली.या आरोपींविरोधात बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास बेलवंडी पोलिस करीत आहेत.पोलिस अधीक्षक राकेश ओला,उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मागदर्शनाखाली पो.नि.संजय ठेंगे,पो.स.ई.राजेंद्र चाटे, स.फौ.रावसाहेब शिंदे,स.फौ. मारुती कोळपे,पो.हे.कॉ. अजिनाथ खेडकर,पो.हे.कॉ. ज्ञानेश्वर पठारे,चा.पो.हे.कॉ. भाऊ शिंदे,पो.ना.शरद कदम, पो.ना.शरद गागंर्डे,पो.ना. नंदू पठारे, पो.ना.संतोष धांडे, पो.कॉ.विनोद पवार,पो.कॉ. कैलास शिपनकर,पो.कॉ.संदीप दिवटे,पो.कॉ.सतीश शिंदे,पो.कॉ.सचिन पठारे,मपोना.सुरेखा वलवे यांनी ही कारवाई केली.
