अहमदनगर प्रतिनिधी (दि.६ मे):-शहरातील लालटाकी येथील खुनाच्या गुन्ह्यातील चार वर्षापासुन फरार असलेला आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.घटनेतील फिर्यादी माया वसंत शिरसाठ,वय 35,रा. भारस्कर कॉलनी,लालटाकी, अहमदनगर यांची बहिण भारती आव्हाड,रा.पाथर्डी व फिर्यादी यांचे शेजारी राहणारे सारीका भारस्कर यांचे नातेवाईकांचे पाथर्डी येथे भांडणे झाली होती.त्या कारणावरुन दिनांक 10/04/2019 रोजी दुपारचे वेळी सारीका भारस्कर व त्यांचे नातेवाईक नितीन दिनकर व इतर आरोपींनी फिर्यादी व तिची सासु बेबी शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके,चाकू, तलवारी या हत्यारांनी मारहाण करुन जखमी करुन फिर्यादी यांची सासु बेबी शिरसाठ यांची हत्या केली होती.सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यावरुन गुरनं. 599/2019 भादवि कलम 302,143,147,148,149, 307,504,506 सह भाहकाक 4/25 सह मपोकाक 31 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे एकूण 19 आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.श्री.राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक यांनी फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेश दिले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदारांचे पथक तयार करुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या. नमुद सुचना प्रमाणे पथक फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,आरोपी नामे बाळु घोरपडे हा त्याचे राहते घरी आला असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथकातील पोहेकॉ/मनोहर गोसावी,दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार,पोना/विजय ठोंबरे,पोकॉ/सागर ससाणे, रोहित येमुल,आकाश काळे व रणजीत जाधव अशांनी मिळुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव बाळू अशोक घोरपडे वय 36,रा.सिध्दार्थ नगर, अहमदनगर असे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याबाबत चौकशी करता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास ताब्यात घेवुन तोफखाना पोस्टे येथे हजर केले आहे.पुढील कारवाई तोफखाना पोस्टे करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,श्री. प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक,अहमदनगर व श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी,नगर शहर विभाग, अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
