अहमदनगर प्रतिनिधी(दि.२८ मे):-विविध गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात भिंगार कॅम्प पोलीसांना यश आले आहे.घटनेतील सविस्तर माहिती अशी की,दि. 20/02/2023 रोजी फिर्यादी यांचा चुलत भाऊ याने फिर्यादी यांचे घरात अनाधिकृत पणे प्रवेश करून पैसे मागीतले असता त्यावर फिर्यादी यांनी नकार दिल्याने आरोपी नामे अभिलेख धर्मेंद्र वाघेला(रा.नेहरू कॉलनी,भिंगार ता.जि. अहमदनगर) याने फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादी यांचे घरातील टेबल वर ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम बळजबरीने काढून घेतले व तु जर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली तर पाहून घेईल अशी धमकी दिले बाबत कॅम्प पोस्टे गुरनं 117/2023 भादवि कलम 452,324,504,506 प्रमाणे दि.21/02/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.घटना घडले पासून सदरचा आरोपी हा फरार होता.तसेच सदर आरोपी विरूद्ध कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं 117/2023 भादविक/364,365,452,323,504,503,34 प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात सुद्धा आरोपी हा गुन्हा घडले पासून फरार होता.दि.25/05/2023 रोजी कॅम्प पोस्टेचे सपोनि.श्री.दिनकर मुंडे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि,फरार आरोपी हा नामे पंचशील नगर,नगर पाथर्डी रोड परीसरात आलेला आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने सपोनि श्री.दिनकर मुंडे यांनी लागलीच पोसई/मंगेश बेंडकोळी,पोहेकॉ/संदिप घोडके,पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे,पोहेकाँ/बापुसाहेब म्हस्के,पोना/राहुल द्वारके, पोना/दिलीप शिंदे,पोकाँ/अमोल आव्हाड अशांना बातमीतील हकीकत सांगून पंचशील नगर,नगर पाथर्डी रोड परीसरात सापळा लावला असता तेथे अभिलेख धर्मेंद्र वाघेला वय 30 वर्षे रा.नेहरू कॉलनी,भिंगार ता.जि.अहमदनगर हा उभा असलेला दिसला त्यास वरील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला हजर करून मा.न्यायालयात हजर केले असता आरोपी यास मा.न्यायालयाने 01 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली असून पुढील ताबा कोतवाली पोलीस स्टेशन यांनी घेतला आहे.सदर गुन्ह्यातील अभिलेख धर्मेंद्र वाघेला वय 30 वर्षे रा.नेहरू कॉलनी, भिंगार ता.जि.अहमदनगर याचेवर यापुर्वी खालील
प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
1) कॅम्प पो स्टे गुर नं 39/2010 भा द वि कलम 457,380 प्रमाणे
2) कॅम्प पो स्टे गुर नं 63/2010 भा द वि कलम 457,380 प्रमाणे
3) कॅम्प पो स्टे गुर नं 65/2010 भादवि कलम 457,380 प्रमाणे
4) कॅम्प पो स्टे गु र नं 65/2011 भादवि कलम 379 प्रमाणे
5) कॅम्प पो स्टे गुर नं 113/2011 भा द वि कलम 379,34 प्रमाणे
6) कोतवाली पो स्टे गुर नं 165/2015 भा द वि कलम 324,323,504,506 प्रमाणे
7) कॅम्प पो स्टे गुर नं 25/2017 भा द वि कलम 394,323,504,506 प्रमाणे
8) कॅम्प पो स्टे गुर नं 26/2017भा द वि कलम 309,189 प्रमाणे
9) कॅम्प पो स्टे गुर नं 125/2018 भा द वि कलम 306,34 प्रमाणे
10) कॅम्प पो स्टे गुर नं 362/2018 भादवि कलम 354,323,504 प्रमाणे
11) कॅम्प पो स्टे गु र नं 245/2018 भादवि कलम 326,325,323 प्रमाणे
12) कॅम्प पो स्टे गु र नं 302/2018 भादवि कलम 354,323,504 प्रमाणे
13) कॅम्प पो स्टे गु र नं 148/2021 भादवि कलम 326,324,323 प्रमाणे
14) कॅम्प पो स्टे गुर नं 226/2022 भा द वि कलम 307,504,506 प्रमाणे
15) कोतवाली पो स्टे गुर जि. नं 117/2023 भा द वि कलम 364,365,452,323,504,503,34 प्रमाणे
16) कॅम्प पो स्टे गु र नं 117/2023 भा द वि कलम 452,324,504,506 प्रमाणे
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्री. प्रशांत खैरे.मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल कातकडे,सहा.पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे.
