अहमदनगर प्रतिनिधी (दि.२८ मे):-अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दि.25 मे रोजी दिलीप शेळके या इसमाने आक्षेपार्ह लिखाण केल्याबद्दल निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,दि.21 मे रोजी सोशल मीडिया फेसबुक वर निळू भाऊ फुले आफ्रिकन वासी भाजीपाला वाले या ग्रुप वर एका राजकीय पक्षाशी निगडित असलेल्या नेत्याची पोस्ट टाकण्यात आली होती. त्या पोस्ट खाली दिलीप शेळके यांनी कमेंट करत असताना मेहतर वाल्मिकी समाजाविषयी जातीवाचक लिखाण सोशल मीडियावर केल्याने नाहीतर वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.तरी संबंधित लिखाण केलेल्या दिलीप शेळके या समाजकंटकावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करावा अन्यथा मेहतर समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशी मागणी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष सनी खरारे,उपजिल्हाध्यक्ष राहुल लखन,दीपक नकवाल,कुणाल बेद,विक्रम चव्हाण,प्रशांत पाटोळे,सिद्धार्थ सोलंकी,नरेंद्र तांबोळी,अभिषेक भगवाणे, प्रवीण बगन,शुभम टाक,विकी चावरे,आनंद बगन,धीरज बेद,अतुल अपील,संजय खरे,पवन सेवक इ. उपस्थित होते.
